Posts

Showing posts from May, 2025

निसर्गाच्या सानिध्यात...

Image
शहरी धकाधकीपासून लांब जाण्याचा आणि निसर्गाच्या थोडं जवळ जाण्याचा आम्ही प्रयत्न केला. शनिवार आणि रविवार जोडून आलेली सुट्टी, शिवाय में महिन्याचा शेवटचा निवांत शनिवार, त्यामुळे काय करावं, कुठेतरी जावं का... हे विचार आमच्या मनात घोळत होते. आमच्यातल्याच एकाने आकाश म्हडगूत या माणसाचं नाव सुचवलं. नेचर वॉक, नेचर हाईक, असे अनेक उपक्रम आकाश राबवतो. त्यातलाच एक आहे मुंडा डोंगर नेचर हाईक... बुधवारी आमचा विचार पक्का झाला. गुरुवारी आकाशशी बोलणं झालं आणि शुक्रवारी पैसे भरून, मी, माझी बायको, माझी मुलगी आणि आमचे अजून दोन नातेवाईक शनिवारी म्हणजेच २४.०५.२५ रोजी होणाऱ्या या हाईकसाठी सज्ज झालो. बोरिवलीवरून घोडबंदर रोडकडे वळल्यावर, सुमारे १५ किलोमीटरवर काजूपाडा आहे. तिथूनच जवळ आहे मुंडा डोंगर. सकाळी ८ वाजता काजूपाडा बस थांब्याजवळ भेटायचं ठरलं. आम्ही एकदम वेळेवर तिथे पोहोचलो. आकाश आमची वाटंच पाहत होता. अजून काही मेंबर गोळा झाले आणि आमची नेचर हाईक सुरू झाली. काजूपाडा बस थांब्याच्या बाजूलाच दोन छोटी हॉटेल्स (ढाबे) आहेत, जिथे पार्किंग करता येतं. बाकी कुठेही, गाड्या उभ्या राहू शकतील अशी जागा नाही. तर काजूपाडा बस...