Posts

Showing posts from November, 2024

नयनरम्य संगमेश्वर-कोयना...

Image
दर वर्षी दिवाळीत किंवा डिसेम्बरमध्ये आम्ही पारिवारिक सहलीला जातो. कोकणातला काही भाग पायांखालून घालावा आणि तिथला निसर्ग नजरेत साठवावा यासाठी , यंदा संगमेश्वर आणि कोयना या जागा निवडल्या... या सहलीची मुख्य गम्मत म्हणजे आमच्यासह अजून एक परिवार यात सामिल झाला होता. सहलीला जाण्यापेक्षा ठरवा-ठरवीतच जास्त मजा येते. पार अगदी हिमाचल प्रदेशमधून खाली उतरत , मध्यप्रदेश आणि राजस्थानमार्गे आमच्या गप्पांची गाडी महाराष्ट्रात येऊन पोहोचली. जर महाराष्ट्रच , तर कोंकण का नको... या विचारावर सगळ्यांचं एकमत झालं आणि संगमेश्वर या ठिकाणावर शिक्कामोर्तब झालं... तसं संगमेश्वरला बाय रोड देखील जाऊ शकतो. जवळपास साडे सहा तास लागतात. पण कोकणात जायचं आणि ट्रेनची मजा नाही असं कसं होईल... जन शताब्दीच्या "विस्टाडोम" या डब्याचा विचार मनात घोळत होता. विस्टाडोम हा एकच डबा असतो ज्यात फक्त ३६ सीट्स असतात. त्यामुळे बुकिंग सुरू झाल्या झाल्या फुल होऊन जातं. मला फक्त पंधरा मिनिटं उशीर झाला आणि विस्टाडोमचं बुकिंग फुल झालं. वेटिंग लिस्ट १४ पर्यंत गेली... इथे मुद्दा असा , की शंभर सीटमधून १४ पास होणं सोपं आहे. पण ३६ मधून...