Posts

पारंपारिक हिरवळ...

Image
पूर्व तयारी... सालाबादप्रमाणे यंदाही दिवाळीत कुठेतरी फिरायला जाण्याचे विचार मनात येऊ लागले. असं म्हणतात ना, की आपल्या मनात काही आलं, तर त्या दिशेने योग्य विचार करण्यासाठी सभोवतालचं वातावरण आपली मदत करतं. तसंच काहीसं माझ्यासोबत झालं. टी.व्ही. लावताच अचानक समोर दिसणारा एक चित्रपट, नव्याने उघडलेल्या एका हॉटेलमध्ये भिंतींवर लावलेली चित्र, कोणाच्यातरी मुखातून येणारे काही शब्द, या सगळ्यातून हे वातावरण आपल्याला केरळविषयी सुचवू पाहतंय हे लक्षात आलं. हा विचार मी बायको-मुलीला ऐकवला. त्यांनाही एका फटक्यात पटलं. गेल्या वर्षी संगमेश्वर-कोयना सहलीत आमच्यासोबत अजून एक कुटुंब होतं. याही वर्षी त्यांना विचारावं म्हणून प्रश्न टाकला. दोन दिवसांनंतर त्यांचं होकारार्थी उत्तर आलं. ठरलं तर मग. दोन कुटुंब मिळून सहा जण आणि केरळ हे ठिकाण... केरळवर शिक्कामोर्तब झालं आणि प्रश्न आले किती दिवस जायचं, कोणते दिवस जायचं आणि कुठे जायचं. आम्ही ठरवलं सर्वांनी समोरासमोर भेटून चर्चा करू. सहलीची खरी मजा येते, ती ठरवा-ठरवीमध्ये. दोन्ही कुटुंब केरळला आधी जाऊन आली होती त्यामुळे त्यावेळचे अनुभव, गमती-जमती, पाहिलेली ठिकाणं यातून ...